Washim : रोजचंच झालं मड,त्याले कोण रडं!” विद्युत वितरण व्यवस्था शासनाचा केवळ पांढरा हत्ती म्हणून पूढे येत आहे.

 

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील

 

रिसोड तालुक्यातील रिठद येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण चे ३३के.व्हि उपकेंद्राततून गावठाण करीता वितरीत होणारी लाईट दररोज रात्री तिन- चार-पाच वेळा तासंन-तास गूल होत आहे.हा वितरण व्यवस्थेत गोंधळ होत असल्याने संबंधित दूरुस्ती विभागाचे लक्ष नसल्याने कदाचित हा प्रकार घडत आहे.किंवा हा कारभार चालवणारे वरिष्ठांना याबाबत माहीती देत नसावेत.यामुळेच हे प्रकार दररोजच्या रात्री घडत असतात.गत काही महिन्यांपूर्वी आसेगावपेन येथील आ‌ॅपरेटरने माहिती दिल्याच्या कारणावरून रोजंदारीवर असलेल्या व्यक्तीला कामावरून तात्काळ काढले.

 

 

 

जसे या व्यक्तीने वितरण कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान केले.पण चूक वरिष्ठांचीच होती.दूरुस्तीकडे लक्ष न दिल्यानेच दोषी आ‌ॅपरेटरला ठरवलं (आपलं ठेवायचं झाकून,दुसऱ्याच बघायचं वाकून)खरं तर दुरुस्ती साठी १५ वेळा वरिष्ठ कार्यालयास कळवले असतांनासुद्धा दखल घेतली नाही.त्यामुळे आसेगावपेन विद्युत वितरण केंद्र बंद पडण्याची शक्यता जादा होती. पण आईबाबाचा व घरातील कर्ता पूरुष कुटुंबासाठी काय असतो त्या मायबापालाच माहीत पण आत्ता दि.६-७ आक्टो. च्या रात्री व या अगोदर दररोजच रिठद विद्युत उपकेंद्रातील गावठाण वितरण मध्ये दररोजच्या रात्री लाईट जात असल्याने कुणाला दोषी धरणार ? वरिष्ठ अधिकारी यांनी दुरुस्ती करावी लागत असेल त्यामुळे जर वितरण व्यवस्थेत अडथळे निर्माण होत असतील तर दोषी कुणाला धरणार ? कोणताही अधिकारी कनिष्ठ कर्मचारी यांनाच दोषी धरुन शिक्षा सुनावली जाते पण आपणच कर्तव्यात कमी पडलो.

 

 

 

याबाबत आपणच दखल घ्यायला हवी होती, पण घेतली नसल्याने वितरण व्यवस्थेत असे अडथळे निर्माण होत असावेत असं कधी होतांना दिसत नाही हे काळातील जनतेच दुर्दैव २४ तास ड्युटी असणारे सुद्धा रात्री घरी झोपेत असतात स्थानिक आ‌ॅपरेटरसुद्धा लाईनमन सकाळच्या वेळात जेव्हा येईल त्यावेळीच वितरण व्यवस्था सुरू होईल अशी माहिती देऊन आ‌ॅपरेटर मोकळा होऊन जातो.पण वितरण व्यवस्थेतील कायमचा अडथळा मात्र दूर होतांना दिसत नाही.हे ग्राहकाचे दुर्दैव आहे.हे नित्यनेमाने चालू आहे.कुणीही अधिकारी या बाबी गंभीरपणे घ्यायला तयार नाही.कारण शेतकरी आपल्या सोयाबीनच्या सोंगणीच्या कामात व्यस्त आहे.

 

 

जर वेळीच माल घरी आला नाही व पावसाने नुकसान झाल्यास वर्षभरात कुटुंबातील सदस्य कसे जगतील या गोष्टींमुळे लक्ष द्यायला वेळ नाही दिवसभर कष्ट करा रात्री निश्चिंत झोपायचे तर लाईट राहातं नाही.मच्छर झोपू देत नाहीत.यादरम्यान एखाद्या कुटुंबातील सदस्यांना डेंगूचा आजार झाला तर दवाखान्यात आठ-दहा दिवस भरती राहावे लागते व भले मोठे बिल शेवटी हातावर येऊन पडते.अशा बाबींमुळे व आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत येतो व आत्महत्या करण्यास मजबूर होतो.

 

 

 

अशा छोट्या- छोट्या गोष्टी विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाहीत मग याकडे लक्ष कोण देणार? या यक्ष प्रश्नाची उकल व्हायलाच हवी.जर झाली नाही तर नैतिक जबाबदारी घेऊन स्वतःहून अधिकारी पायउतार होतील का? *”पण असं कधिच होणार नाही, त्यामुळे दररोज च मड, त्याला कोण रडं “* हा विद्युत पुरवठा कशामुळे खंडित होत आहे, हे पाहणे गरजेचे आहे.दररोजच हा त्रास ग्राहकांना व्हायला नको.