washim : भर जहागीर ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा दिला होता इशारा ; ग्रामपंचायतने घेतली दखल,आंदोलन स्थगित, आंदोलनाला यश

 

washim

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

 

washim : रिसोड तालुक्यातील भर जहागीर bhar jahagir येथील ग्रामपंचायत येत असलेल्या ईक्लास क्षेत्रातील गट नंबर ५९,६१,६२,६३ क्षेत्रावरील अनाधिकृत बांधकामे काढून टाकण्याबाबत भर जहागीर ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित अतिक्रमणधारकांना आसरा माता मंदिराच्या परिसरात तील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी व या अतिक्रमण धारकाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांच्या नेतृत्वाखाली भर जहागीर येथे 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

 

 

 

त्यामुळे २ ऑक्टोबर रोजी भर जहागीर bhar jahagir ग्रामपंचायत समोर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ, तालुका अध्यक्ष सय्यद अकील, महीला आघाडी मानवी हक्क अभियानाच्या प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व अतिक्रमणधारक हे आंदोलन स्थळी उपस्थित झाले त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक २०/९/२०२४ रोजी दिलेली नोटीस यावेळी रद्द करण्यात आलेली.

 

 

 

 

आहे असे यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी, यांनी आत्मदहस्थळी ग्रामपंचायत समोर लेखी स्वरूपात वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष अनिल गरकळ व अतिक्रमणधारक यांना प्रत्यक्ष पत्र देऊन कळविले व आपले सामूहिक आत्मदहन करण्याचा विचार सोडून द्यावा हे आंदोलन स्थगित करावे असे आंदोलकांना (अतिक्रमणधारक) लेखी पत्र देऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले. सर्व आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ पातळीवरील जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, उपविभागीय अधिकारी वाशिम, तहसीलदार रिसोड, गट विकास अधिकारी पंचायत समिती रिसोड, यांना माहितीस्तव ग्रामपंचायत च्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.