वाशीम जिल्हा प्रतिनिधी / नारायणराव आरु पाटील
अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी मोठ्या अथक प्रयत्नानंतर आज अखेर १५ फुट खोल पाण्यातील तलावात तळाशी असलेला व गाळात फसलेला मृतदेह शोधून वर आणलाच वाशिम(washim) जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांचा मोबाईल आदेश आणी निवासी उप-जिल्हाधीकारी विश्वनाथ घुगे सर यांचा लेखी आदेशानुसार आजचे मोठे सर्च ऑपरेशन दीलेल्या वेळात यशस्वी केले.
वाशिम जिल्ह्य़ातील रिसोड तालुक्यातील ह.मु. सवड परंतु माळसी ता.शेनगाव जि.हिंगोली येथील मुळ रहिवाशी अशोक हरिभाऊ वाकळे अंदाजे वय (६५) वर्ष २१ सप्टे. रोजी स. १० वा. वाजताच्या सुमारास तलावातुन शेतात पोहत जातांना तलावात बुडाल्यी माहीती मिळताच काठावर वाट पाहात बसलेल्या त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली असता गावातील स्थानिक पातळीवर अशोक वाकळे यांचा दिवसभर शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही
यामुळे रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर मॅडम यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता रात्रीच पाचारण केले होते.लगेचच जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार,अंकुश सदाफळे, शेखर केवट,विष्णु केवट, धिरज राऊत,शिवम वानखडे,अमर ठाकूर,हर्षल वानखडे यांना रेस्क्युबोट सह शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळी रवाना केले.
रात्री सिन ट्रेस केला असता गाळ आणी डेफट जास्त असल्याने तसेच अंधार झाल्याने महत्वाचे नेमक बुडाल्याचे लोकेशन माहीती नसल्याने सर्च ऑपरेशन शक्य नसल्याची चर्चा तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर मॅडम यांच्याशी करुन २२ सप्टें. ला सकाळीच ७.००वा. सर्च ऑपरेशन चालु करणार असे सांगीतले,ठरल्या प्रमाणे आज सकाळीच तहसीलदार तेजनकर मॅडम यांच्या आदेशानुसार ऑपरेशन चालु केले असता शेवटी तलावात अथक प्रयत्नांनंतर आज दुपारी २.३५ मी. १५ फुट खोल पाण्यातील खाली तळाशी गाळात असलेला मृतदेह शोधून वर आणत बाहेर आनला .
यावेळी घटनास्थळावर तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर मॅडम, ना.त.बाळासाहेब दराडे, मं.अ.नप्ते साहेब,मं.अ. पडवे साहेब,तलाठी नेमाडे साहेब,कोतवाल पुजा मोरे यांच्यासह पो.स्टे.रीसोड चे ठाणेदार भुषण गावंडे, पिएसआय गोखले साहेब, पो.काॅ.विनोद जायभाये, पो.काॅ.मिलींद गायकवाड, यासह सवडचे सरपंच दशरथ मोरे,उपसरपंचा दुर्गाबाई राऊत,पोलीपाटील रमेश लाटे, मोहीत जाधव,आणी गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते.आपत्तीव्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब हेही संपर्क साधुन होते.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.