Washim : अटकळी ते केकत उमरा रस्त्याचे दुरावस्था, लोकप्रतिनिधी लक्ष देतील का..? विठ्ठल माळेकर

 

 

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

वाशिम (Washim) तालुक्यातील अटकळी ते केकत उमरा हा रस्ता जवळपास ९ किलोमीटर लांबीचा असून या रस्त्याची दुरावस्था होऊन दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही कित्येक वर्षे लोटली या रस्त्याने मोटरसायकल नेत असतांना किंवा चार चाकी कोणतेही वाहन जात असताना अंगाचा मात्र खुळखुळा होतो.

 

 

जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणारा कोणीही नेता उरला नसल्याचे येवती येथील विठ्ठल माळेकर यांनी बोलतांना तिव्र भावना व्यक्त केल्या.या रस्त्यावर खड्ड्यात खड्डे झाले असून त्या रस्त्यावर पाण्याची गटार साचली आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी या बाबीची दखल घेऊन या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करून घ्यावी. व नव्याने खडिकरण व डांबरीकरण करण्यात यावे.आणी प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी येवती येथील विठ्ठल माळेकर यांनी बोलताना व्यक्त केली.