वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
वाशीम : वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक पाहणी करूनही ‘अनुदानापासून’ वंचित ठेवण्याचा प्रकार घडला असून याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर पीक पेरा पीक नोंदनीच्या माध्यमातून केला असून त्यांची शासन दरबारी नोंद नसल्याचे तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडून समजते परंतु ज्यांच्या सातबारावर नोंद झाली नाही,पिक पेरा केला अशांची नावे आमच्या यादीत नसल्याचे कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितल्याचे शेतकऱ्याकडून समजते हा प्रकार प्रत्येक वाशिम washim जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घडला असून शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहणार असल्याचे यावरून समजते. कृषी सहाय्यक यांनी सांगितले.
की जोपर्यंत शासनाकडून आम्हाला अधिकृत वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या येत नाहीत तोपर्यंत आम्हाला काहीही करता येत नाही असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे शासन एकीकडे घोषणांचा पाऊस पाडत आहे, जसे की सोयाबीन/ कपाशी या पिकाला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येईल त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली असतांनाच अनेक शेतकरी या लाभापासून वंचित असून आणि इतर ज्या सातबारावर ईपीक पेऱ्याची नोंद झाली नाही परंतु शेतकऱ्यांनी मात्र ईपीक द्वारे नोंद केली अशा शेतकऱ्यांचे कसे होणार ? याबाबत सरकारलाने वस्तुस्थिती चार विचार करायला हवा. ज्यांनी २०२३ मध्ये ईपीक पाहणी ॲप द्वारे सोयाबीन व कपाशी या पिकाची केली असेल अशाच संबंधित शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल.
असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले परंतु तसे होतांना कोठेही जिल्ह्यात दिसत नाही. याबाबत शासनाने शेतकऱ्यांसाठी असलेला अविर्भाव केवळ दिखावाच आहे असे मात्र यातून दिसते. परंतु शासनाने असे न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून याबाबतची दखल घेऊन महसूल व कृषी विभागाला तसे आदेशित करावे व ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केली त्याची नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांचा जरूर विचार होईल अशी अपेक्षा शेतकरी सध्या तरी करीत आहेत. अशा भोंगळ कारभाराने शेतकरी मात्र खूप वैतागला आहे. ईपीक पाहणी सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर करण्याचे सांगितले परंतु ती केल्यानंतरही जर लाभ मिळत नसेल तर मग याला जबाबदार कोण हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे म्हणूनच काही काही शेतकऱ्यांनी यावर्षी त्रस्त होऊन ईपीक पाहणी केली नाही.