वाशिम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरू पाटील
washim : आज दिनांक १४ आक्टो. रोजी न भूतो न भविष्यती असा ट्रॅक्टर मोर्चा आज रिसोड risod शहरात शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यासाठी निघाला.रिसोड riso तालुक्यातील महाविकास आघाडी mahavikas aghadi सक्षमपणे असून रिसोड तालुक्यातील एकजुटीचा शेतकऱ्यांच्या ज्वलंत मुद्द्यावर ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्याचे जे विविध प्रश्न आहेत.
त्यावर मंथन करून शासनापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी ‘महाविकास आघाडीच्या’ माध्यमातून रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे दिलीपरावजी सरनाईक, महाविकास आघाडीचे समन्वय बाळासाहेब देशमुख, शिवसेनेचे रिसोड मालेगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार चे अमित पाटील खडसे जिल्हा परिषद सदस्य, कैलास पाटील खानझोडे, या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सभापती वैभव सरनाईक, रामेश्वर देवकर तालुकाध्यक्ष (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), नारायण आरु शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), गजाननराव सरनाईक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) अमोल पाटील नरवाडे, घनश्याम मापारी, गणेशराव देशमुख, डॉ.गजानन सानप, शेवाळे, बबनराव गारडे, बबनराव सानप, संजय शिंदे, गजानन खोडके, विठ्ठलराव केनवडकर, इत्यादी अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व या ट्रॅक्टर मोर्चा सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा संत अमरदास बाबा मंदिर परिसर येथून अष्टभुजा देवी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कालू शहा बाबा दर्गा या सर्वांना पुष्पहार घालून तहसील कार्यालयावर हा ट्रॅक्टर मोर्चा धडकला. शेतकऱ्याच्या मागण्यांमध्ये सोयाबीन पिकाला ६०००/-रु. पेक्षा जास्त भाव मिळावा, भरलेला पिक विमा अद्याप पर्यंत मिळाला नाही, स्प्रिंकलर ची सबसिडी पण मिळाली नाही विद्युत वितरण कंपनीकडून पाहिजे त्या वेळात लाईट मिळत नाही, वाशिम जिल्ह्यात पाऊस जास्त पडून सुद्धाओला दुष्काळ जाहीर केला नाही तो करणे. वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे संरक्षण इत्यादी अनेक मागण्या शेतकऱ्याच्या ज्वलंत मुद्द्यावर हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार अमित झनक, विश्वनाथ सानप बाळासाहेब देशमुख, दिलीपरावजी सरनाईक, इत्यादी मान्यवरांची समायोजित शेतकऱ्यांच्या ज्वलंत मुद्द्यावर आपले विचार व्यक्त करून येणाऱ्या काळात या सरकारला गाडायचे आणि आपल्या मागण्या जर यांनी पूर्ण नाही केल्या तर परत यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा मानस आमदार अमित झनक यांनी बोलून दाखवला या ट्रॅक्टर मोर्चामध्ये जवळपास 500 च्या वर ट्रॅक्टर व शेतकरी सहभागी झाले होते. पुढच्या वेळी १००१ट्रॅक्टर जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेऊन जाऊ असे अमित पाटील झनक यांनी सांगितले. वया ट्रॅक्टर रॅली नंतर रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना शेतकऱ्यांच्या मागण्याची निवेदन देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल पाटील नरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शनप्रा.विजय तुरुकमाने यांनी केले.