
नारायणराव आरु पाटील,वाशिम/वाशिम
रिसोड तालुक्यातील वरुडतोफा या छोट्याशा गावातील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक शंकर बोरकर व त्यांचे सहकारी शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना स्वकर्तृत्ववान होण्यासाठी व जिवनात जगण्याची उमेद निर्माण करणारे कौशल्याचे पाठ,राखी बनवण्याचे कार्य शिकवल्या जाते.
याचे भाग्य ग्रामीण भागातील वरुडतोफा गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत वर्ग घेतल्या जातात. यापेक्षा पालक वर्गाला अजून काय हवंय! कारण अशा शाळेत व जीवनात स्वयंपूर्ण होण्यासाठी विद्यार्थी घडत असतील तर भविष्यात पालकांची चिंता नक्कीच दूर होईल व मुलं,मुली कर्तृत्ववान घडतील हे मात्र नक्की…