
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
वाशीम : दिनांक ९ ऑक्टो. रात्री ९ वाजता वाशिम रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ वर ‘आसेगाव’ पेन जवळ कोयाळी फाट्यावर जास्त वेगामध्ये दुचाकी वाहन वाहनाने टक्कर देऊन सागर खंडारे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून सागर खंडारे आसेगावपेण येथील रहिवासी आहेत. प्रसन्नजीत सागर खंडारे यांनी १३ ऑक्टो.ला रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की सागर खंडारे हे शेतात गेले होते आणि त्याच दरम्यान रात्री नऊ वाजता वापस येतांना दुचाकी वाहनाने धडक दिली दुचाकी क्रमांक एम एस ३७ ए बी ७४५३ या मोटरसायकल क्रमांकानुसार बाईकस्वरावर २८१ १२५(बी) १८४ कलमनुसार गुन्हा दाखल केला.