वाशीम : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेने काढलेल्या पत्रकार संवाद यात्रेला यश

 

वाशीम

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

 

 

वाशीम : महाराष्ट्र राज्य ‘पत्रकार’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय वसंतरावजी मुंढे, आदरणीय विश्वासरावजी आरोटे, आदरणीय सपकाळे साहेब, विदर्भ प्रमुख आदरणीय निलेश सोमानी, जिल्हाध्यक्ष आदरणीय निनाद बापू देशमुख यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पर्यंत पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली होती. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ही पत्रकार संवाद असून या संवाद यात्रेचे फलित म्हणून राज्य सरकारने पत्रकार व विक्रेता त्यांच्यासाठी दोन स्वतंत्र मंडळे स्थापन करण्यास मंजुरात दिली असून पत्रकार व विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र मंडळे स्थापन होणार आहेत.

 

 

 

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ वाशिम जिल्हा व रिसोड तालुक्याच्या वतिने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या दिक्षा भुमी ते मंत्रालय मुंबई या पत्रकार संवाद यात्रेला यश मिळ्यामुळे फटाके फोडुन जयघोष करीत जल्लोष करण्यात आला.यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख, आरोग्य सेल जिल्हाध्यक्ष केशव गरकळ, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष गणेश देगावकर, तालुकाध्यक्ष अरुण क्षिरसागर, शहराध्यक्ष प्रदिप खंडारे, नारायण आरु,संचिन गांजरे, डॉ प्रल्हाद कोकाटे, डॉ विलास ठाकरे, प्रदिप देशमुख, ज्ञानेश्वर कायंदे, डॉ रामेश्वर रंजवे, संतोष जुमडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.