शासनाने अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरसकट मदत द्यावी.

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

रिसोड येथून जवळ असलेले लिंगा कोतवाल या गावी अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व शेतामध्ये जे संगळलेले पाणी आणि विहिरीचे जे असलेले पाणी याच्यामध्ये शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आला आणि इथून पुढे जे काही होणारे नुकसान हे कशाने भरून काढायचे अशी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहेत.

 

तरीही शासनाने तलाठ्या मार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी व शेतकरी सणासुदीच्या दिवसांमध्ये खूप अडचणीत असल्यामुळे त्यांना पुढे काय करायचे व कसे दिवस काढायचे हे सुद्धा कळेना झाले आणि तालुक्याच्या ठिकाणी जवळ पैसे नसल्यामुळे शेतकरी हा आलेले सण सुद्धा करू शकत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत शासनाने न दिल्यामुळे तो डोक्याला हात लावून बसलेला आहे.

 

इथून पुढे बळीराजा हा कोणाचा नसल्यामुळे खूप शेतकरी चिंतेत पडलेला आहे पुढे शेती व पुढील पीक कसे घ्यायचे हे सुद्धा त्याच्या डोक्याच्या बाहेरची गोष्टी झालेल्या आहेत आणि होणारे नुकसान हे शासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही आणि शेतकऱ्यांनी पुढे काय करायचे जर शेतकरी नाही तर ला तर शासनाला जे अन्नधान्य पुरवठा मिळायचा तो कुठून मिळणार आणि जर शेतकऱ्याचा कोणी विचार करत नसेल तर इथून पुढे काय करायचे हे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे आणि जे भाव भेटायचे ते सुद्धा शेतकऱ्यांना कधी भेटत नाही.

 

 

व्यापाऱ्याजवळ येणारा माल हा ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ माल असतो त्यावेळेस भाव मिळत नाही. आणि खर्च सुद्धा निघत नाही हमीभाव सुद्धा आत्तापर्यंत कधी शासनाने जारी केलेला नाही त्यामुळे इथून पुढे एकरामागे लागणारा खर्च हा २० ते २२ हजार रुपये खर्च होतो आणि सोयाबीनला भाव ३८००/-,४०००/- असा भाव मिळतो आणि त्यामुळे निसर्गांनी अतिवृष्टी अधिक होणारे पाऊस पाणी यांना कसे तोंड द्यायचे आणि कसे चालवायचे पावसाळ्याच्या दिवसात येणारे सण एकामागे एक चालूच असतात

 

 

आणि शेतकऱ्याच्या घरात अन्नधान्याची टंचाई आणि पैसा सुद्धा मिळत नाही पुढे जीवन कसे जगायचे आणि कसे राहायचे हे त्याला कळेना झालं बळीराजांनी जर साथ सोडली तर शासनाने सुद्धा विचार करायचा असते पण शासन सुद्धा कधी त्याचा विचार करत नाही पोळा सुद्धा सण असा गेलास ही गोष्ट शासनाला कशी कळेल आणि कसा विचार करेल व सणा मागे सण म्हणजेच गणपती,

 

 

महालक्ष्मी आणि दसरा, दिवाळी त्यानंतर सणासुदीच्या काळात लेकी- बाळीच, लग्नकार्य या पिकामध्ये शेतकऱ्यांना भागवायचे असते ते सुद्धा या पिकावर अवलंबून असतात आणि जर सोयाबीन घरात आली नाही तर लग्न व कार्य होणारे खर्च हे कसे भागवायचे हे सुद्धा विचार करावे लागेल पुढील शासनाने शेतकरी वर्गाचा विचार करावा आणि त्यांना आर्थिक जेवढी मदत करता येईल तेवढी शेतकऱ्यांना करावी शेतकरी सुखी तर जग सुखी शेतकरी हा देशाचा पोशिंदा मानल्या जातो परंतु त्याचा विचार कोणीही सुद्धा करत नाही.