washim : चोरद रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे, अधिकाऱ्यांचे तर कंत्राटदाराला पाठबळ नाही ना?

 

washim

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

washim : मंगरूळनाथ mangarulnath तालुक्यातील चोरद रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चोरद गावकरी करीत आहे ,चोरद ते शेलुबाजार हे मुख्य मार्ग आहे. तालुक्याला जोडणारा हा प्रमुख मार्ग असून हा रस्ता नेहमीच शेलुबाजार ते जनुना खुर्द व चोरद असा हा रस्ता नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे.

 

 

 

असे असतांना गेल्या दहा वर्षापासून सदर रस्त्याचे ‘दुरुस्तीचे’ काम झालेले नव्हते, परंतु आता सदरच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असून दोन्ही बाजूने साईड पट्टी खोदून त्यावर मुरूम व लाल माती टाकून पाणी टाकून दबाई करणे आवश्यक आहे. परंतु तसे न होता थातूरमातूर काम केले जात आहे व त्या कामाकडे मुद्दाम संबंधित दुर्लक्ष करीत आहेत. या ठिकाणी संबंधित अभियंता यांनी लक्ष घालावे व संबंधित ठेकेदाराकडून चांगले काम करून मिळावे. अशी अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहे,