
पुरुषोत्तम बोर्डे/बुलढाणा
गतवर्षी 2024 मध्ये होऊ घातलेल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा खा.भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये आझाद समाज पार्टी स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले असता. विविध पक्ष, सामाजिक संघटना आप -आपल्या तरीने निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपला उमेदवार उतरवित आहेत. त्याचप्रमाणे आझाद समाज पार्टी सुद्धा जिल्ह्यातील सर्व विधानसभा स्वबळावर लढणार असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी केले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश मधील नगीना या मतदारसंघा मध्ये भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा.भाई चंद्रशेखर आझाद हे 1 लाख 51 हजार मताधिक्यांनी त्या ठिकाणी निवडून आले .आणि देश पातळीवर खा. भाई चंद्रशेखर आझाद यांचा फार मोठा संघर्ष असून, बहुजन समाजाला एक नवीन उभरत नेतृत्व मिळालं आहे.त्याचप्रमाणे भाई चंद्रशेखर आझाद यांचा देशभरात फार मोठा चाहता वर्ग असून. दलित, बहुजन, उपेक्षित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर ,कामगार , विद्यार्थी, कर्मचारी इत्यादी शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका भाई चंद्रशेखर आझाद यांची आहे.
आणि याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आझाद समाज पार्टी कांशीराम या पक्षाची राजकीय भूमिका बजावून विधानसभेमध्ये आपल्यातीलच सामाजिक बांधिलकी जोपासणारा, समाजाच नेतृत्व, करणारा एखांदा प्रतिनिधी विधानसभेमध्ये असायला हवा. जेणेकरून बहुजन, उपेक्षित ,मुस्लिम, आदिवासी इत्यादी घटकाच्या ज्या समस्या निर्माण झाले आहेत. त्या समस्या सोडवण्याचं काम त्याच्या हातून घडेल. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आझाद समाज पार्टी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका लढणार आहे. त्यामुळे बऱ्याच राजकीय पक्षांचे राजकीय उमेदवारांचे डोकेदुखी वाढण्याचे संकेत दिसत आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभापैकी तीन विधानसभा मध्ये आझाद समाज पार्टी चे तीन उमेदवार जाहीर झाले असून त्यापैकी चिखली विधानसभा मध्ये आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखडे हे लढणार असून. गेल्या सहा ते सात वर्षापासून खा.भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे काम वाढवीत आहेत. त्याचप्रमाणे मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मध्ये पत्रकार तथा माजी सरपंच व तालुकाध्यक्ष रामदास कहाळे हे लढणार असून, गेल्या तीन पंचवार्षिक पासून मेहकर विधानसभा मतदारसंघ एस सी प्रवर्गा साठी राखीव आहे.
त्या ठिकाणी गेल्या तीन पंचवार्षिक सलग तीन वेळा ग्रामपंचायत मध्ये आपली छबी उमटवणारे आझाद समाज पार्टी जिल्हाकोअर कमिटी सदस्य संदीप भाऊ खिल्लारे हे लढणार आहे. त्याचप्रमाणे खामगाव जळगाव जामोद मलकापूर व बुलढाणा या विधानसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार पक्षाच्या संपर्कात आहेत या सर्व उमेदवाराची पक्षाच्या वतीने चाचपणी करून योग्य उमेदवाराला संधी देण्यात येईल.
या पत्रकार परिषदेला आझाद समाज पार्टी चे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी त्यामध्ये जिल्हा सल्लागार पत्रकार सचिन खंडारे ,जिल्हा महासचिव संदीप भाई इंगळे, जिल्हा प्रवक्ता ज्ञानेश्वर काकडे,जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीण गवई ,जिल्हा कार्याध्यक्ष पंजाबराव गवई, जिल्हा कोर कमिटी सदस्य संदीप खिल्लारे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष रामदास कहाळे,बबन सरकटे, शरद सरकटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.