“रस्ता देता.. का.? कुणी रस्ता”. रिसोड ते घोन्सर रस्त्याची दुरावस्था,शासनाचे याकडे दुर्लक्ष.

 

 

नारायणराव आरू पाटील/ प्रतिनिधी

 

रिसोड शहरानजीक असलेले व मराठवाडा विभागाशी जोडलेले घोन्सर छोटेसे गाव आहे. येथील लोकसंख्या कमी असल्याने लोकप्रतिनिधी जाणून-बुजून समस्यांकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे हा रस्ता ग्रामीण रुग्णालय (रिसोड) ते घोन्सर इतका खराब झाला की त्या रस्त्याने चालणे किंवा चारचाकी वाहन व मोटरसायकल चालवणे सुद्धा कठीण झाले आहे.या रस्त्यावर ये-जा करत असतांना बऱ्याच लोकांना कमरेचे, मणक्याचे व मानेचे आजार जडले आहेत.

 

 

 

त्यामुळे येथील नागरिक ये- जा करण्यासाठी त्रस्त झाले. या बाबीकडे कोणताही बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नाही व लोकप्रतिनिधीनां मतदानासाठी मतदारांची संख्या कमी असल्याने तेही लक्ष देत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या बाबीची निदान बांधकाम विभागाचे अधिकारी दखल घेऊन आपल्या कर्तव्यप्रती इमान -इतबारे लक्ष दिल्यास जनतेच्या समस्या सुटतील व समस्याग्रस्त असलेले नागरिकही कामे झाली तर अभिमानाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभारही मानतील.