
नारायणराव आरु पाटील, वाशिम/कट्टा न्यूज नेटवर्क
रिठद येथील जय भोले कावड मंडळ भीमाशंकर ते रिठद पायदळ प्रवास. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जय भोले कावड मंडळातील जवळपास ५० चे वर तरुण कावड यात्रेमध्ये सहभागी होत असतात. परंतु यावर्षी भीमाशंकर ते रिठद हा पायदळचा प्रवास ५५० किलोमीटरचा अजून यामध्ये ११ मुक्काम होते. या मुक्कामात ४०,५०,६०, किलोमीटरचे अंतर दररोजचे मुक्कामाच्या ठिकाण पर्यंत पैदल चालत असत हे जय भोले कावड मंडळ पाऊस ऊन वारा याची चिंता न करता ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दररोजचे अंतर पार करत होते.
त्याप्रमाणे दिनांक ३/८/२०२४ ला भीमाशंकर येथून निघालेली जय भोले कावड मंडळ दिनांक १८/८/२०२४ ला रिठद येथे मुक्कामी पोहचले आणि दिनांक १९ ऑगस्टला समाप्तीची शोभायात्रा ५५० किलोमीटर चा पायदळ प्रवास संपवून रिठद गावाला प्रदक्षिणा घालून या कावड मंडळाची यावर्षीची समाप्ती होणार आहे.