वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : जिल्हा मागासलेला/ आकांक्षीत/ आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत सर्वच बाबतीत या जिल्ह्याला मागासलेपण प्राप्त झाले. कधीही इतिहासाची पाने उलटल्या गेली नाहीत. परंतु आज वाशिम washim जिल्ह्याच्या इतिहासात शैक्षणिक क्रांती होण्याच्या दृष्टीने ‘मेडिकल कॉलेज’ मंजूर होऊन यामध्ये कॅम्प राऊंड तीन मध्ये प्रक्रियेसाठी समाविष्ट झाले आहे त्याबाबतची अधिसूचना सीईटी सेलच्या वेबसाईटवर प्रगट झाली असून वाशिम जिल्ह्याच्या विकासामध्ये कॉलेज शैक्षणिक चळवळीला अवतपूर्वकलाटणी देणारे ठरणार आहे.
त्यामुळे वाशिम जिल्ह्यात हे विकासाचे एक पाऊल पुढे पडून प्रगतीच्या दिशेने वाशिम जिल्हा वाटचाल करण्याच्या मार्गावर आहे परंतु अजून बराच काही प्रगतीचा पल्ला गाठायचा असून प्रगतीच्या वाटेवर सध्या तरी सुरुवात होतांना दिसत आहे महाराष्ट्रातील नीट गुणवत्ताधारक विद्यार्थी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान चॉईस फिलिंग मध्ये प्रेफरन्स देतील १९ ऑक्टोबरला वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निवड यादी जाहीर होईल दिनांक २० ते २३ ऑक्टोबर पर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. असे आमदार अमित झनक यांनी बोलताना सांगितले अशाप्रकारे वाशिम जिल्ह्यात एक स्वप्न या महाविद्यालयाचे पूर्ण होईल.