
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : रिसोड risod तालुक्यातील जि प कें उ प्रा शाळा रिठद 1 येथे वनविभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत, जिल्हा वन अधिकारी.मा अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा ॲडव्हेंचर क्लबच्या आकाश काळे यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा रिठद 1 येथे वन्य जीव सप्ताह साजरा करण्यात आला.यामध्ये वर्ग ५ ते वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेतला सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे व खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाला वनपाल किशोर सरनाईक यांनी सखोल मार्गदर्शन केले.वनरक्षक वैभव पळसकर यांनी सहकार्य केले. ‘कार्यक्रम’ आयोजित करण्याकरिता मुख्याध्यापक मनोज इंगळे, गजानन मापारी सर, किसन साबळे सर, आशाताई बोरकर मॅडम,मदन आरू सर, बाळकृष्ण बोरकर सर, ज्ञानेश्वर आरू सर ह्यांनी मदत केली