रिसोड तालुक्यातील आधार सेंटर संख्या वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रिसोड तालुका यांचे निवेदन.

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या रिसोड तालुका महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यावतीने आज दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी रिसोडचे नायब तहसीलदार दराडे यांना रिसोड तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आधार अपडेट, मोबाईल लिंक, विश्वकर्मा योजना यासंदर्भात आधार अपडेट करण्यासाठी महिलांना खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात असलेली आधारची सेंटरची संख्या कमी आहे.

 

 

 

त्यामुळे ग्रामीण भागातील महिला ह्या शहराकडे येत आहेत व शहरात असलेल्या आधार सेंटरची संख्या ही सुद्धा कमी असल्याने मर्यादेपेक्षा जास्त महिलांची संख्या आधार सेंटरवर वाढत असल्याने शहरात सुद्धा आधार सेंटर वाढविणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येईल व दोन-दिवसात बंद असलेले आधार सेंटर सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले. रिसोडचे नायब तहसीलदार दराडे यांनी तालुक्यातील आधार सेंटरचा आढावा घेतला व ग्रामीण भागातील रिठद येथील आधार सेंटर येथील सध्या स्थितीत बंद असल्याने ते दोन दिवसात सुरू होईल अशी माहिती दिली.

 

 

 

आणि पत्रकारांनी दिलेल्या निवेदनाची माहिती वरिष्ठांकडे पाठविली जाईल असे यावेळी बोलतांना निवासी नायब तहसीलदार दराडे यांनी सांगितले यावेळी रिसोड महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, शहरअध्यक्ष प्रदीप खंडारे, नारायण आरु, डॉ. रामेश्वर रंजवे, संतोष जुमडे,सचीन गांजरे, डॉ .विलास ठाकरे, ज्ञानेश्वर कायंदे इत्यादी पत्रकार मंडळी निवेदन देतांना हजर होती.