नारायणराव आरु पाटील/वाशीम जिल्हा प्रतिनिधी
वाशीम -महावितरण, (Washim MSEB) महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांमध्ये सद्यस्थितीत 40 ते 50 टक्के च्यावर कामगारांची संख्या रिक्त असतांना तसेच ईतर अनेक आव्हानाला तोंड देत तिन्ही विज कंपन्या नफ्यामध्ये आणण्याकरिता तांत्रिक कामगारांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली असल्याने वीज कामगारांना सानुग्रह अनुदान कोणास देण्याची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री यांना निवेदनाद्वारे तांत्रिक कामगार युनियन ने केली असल्याची माहिती केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
तिन्ही कंपनीच्या कामगार, अधिकारी, अभियंता, विद्युत सहाय्यक / उपकेंद्र सहाय्यक यांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रथा आहे. त्यानुसार व्यवस्थापन नियमित / सहाय्यक कामगारांना सानुग्रह अनुदान देत आले असून यावर्षी सुध्दा दीपावली निमित्त तांत्रिक कामगारांसह सर्वाना सानुग्रह अनुदान म्हणुन रूपये 30000/-(तिस हजार) एवढी रक्कम तसेच विद्युत सहाय्यक / उपकेंद्र सहायकांना रूपये 20000/- (विस हजार) देण्याची मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
तांत्रिक कामगार/अभियंता/अधिकारी/विद्युत/उपकेंद्र सहाय्यक यांना विधानसभा आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात यावे अशी मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे,आर. आर. ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी दत्तु भोईर, किरण कऱ्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे, प्रदीप पाटील यांनी केली आहे.