Washim : सरकारचे धोरण,शेतकऱ्याचे मरण, शेतकऱ्याने केले कर्तव्य, वितरणने केले दुर्लक्ष.

Washim

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील

 

वाशिम (washim) जिल्ह्यातील विद्युत वितरण व्यवस्थेवर कायम प्रश्नचिन्ह निर्माण होत राहिले गेले. जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत(mseb) वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे मानोरा तालुक्यातील धानोरा घाटगे येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रामचंद्र पउळ यांनी आपल्या शेताजवळील नाल्यावर विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी २०१८ मध्ये अर्ज केला होता.त्याप्रमाणे या शेतकऱ्यास विद्युत वितरण कंपनीने कोटेशनसुद्धा दिले व ते दिनांक ७/३/२०१८ रोजी पाच हार्सपाॅवरच्या पंपासाठी ५७४८/-रु कोटेशन भरले.

 

 

 

त्यांनतर आज तारखेपर्यंत वर्षातून तीन ते चार फेऱ्या मानोरा तालुका कार्यालय व जिल्हा कार्यालयात मारल्याचे त्यांनी आज दि.१७/१०/२०२४ रोजी वाशिम जिल्हा विजवितरण कंपनीचे कार्यालयात लेखी समस्या घेऊन आल्यावर बोलतांना सांगितले.या अगोदर दि.२०/०५/२०२४ ला विद्युत वितरण कंपनी जिल्हा कार्यालयात अर्ज केला.या कंपनीने दखल न घेतल्याने वाशिम जिल्हाधिकारी (रो.ह.यो.) यांना निवेदन दिले.त्यांनी कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी वाशिम यांना याबाबत कार्यवाही करण्यासाठी दिनांक ६/६/२०२४ रोजी पत्र देऊन कार्यवाही करण्यासंदर्भात सुचित केले परंतु या पत्राला सुद्धा विद्युत वितरण कंपनीने केराची टोपली दाखवली.

 

 

 

व दखल सुद्धा घेतली नाही. परत आज दिनांक १७/१०/२०२४ ला अधीक्षक अभियंता विद्युत वितरण कंपनी वाशिम यांना अर्ज करून शेती पंपासाठी कनेक्शन मिळण्यासंदर्भात लेखी अर्ज करून विनंती केली. परंतु त्यांनी जुन्या कोटेशनचा विचार होणार नाही. आत्ता सध्या स्थितीत विद्युत वितरण कंपनीचे कोटेशन बंद आहेत. शासनाने हे बंद केले आहे. आपण सोलरपंप घ्यावा त्याबाबत एक ते दीड महिन्यात आपल्याला सोलर पंप मिळून जाईल असे सांगण्यात आले. यामध्ये या शेतकऱ्याचा काय दोष ज्याने २०१८ साली नियमाप्रमाणे कोटेशन भरले.

 

 

 

शेतकऱ्याला एका वर्षात किंवा दीड वर्षात विद्युत वितरण कंपनीने विद्युत जोडणी करून देणे गरजेचे होते. परंतु आज पर्यंत सुद्धा या शेतकऱ्याला कोटेशन भरल्याचा विचार/जाग विद्युत कंपनीला कधी आला नाही. शेतकऱ्याचे हित कधी पाहता आलं नाही! व सरकारच्या धोरणामुळे तर सुलतानी संकटाचा वारंवार शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्याचाच प्रकार म्हणून यावर्षी सरकारने विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी जी साईड असते, अर्ज करण्यासंदर्भात ती कायम बंदच करून टाकल्याने शेतकरी फार अडचणीत आला आहे. हा शेतकरी अल्पभूधारक असून याची शेती कोरडवाहू आहे.

 

 

 

गट नं.१०४ शेतालगत नाला आहे. त्याचा पाणी परवाना सुद्धा या शेतकऱ्यांनी काढलेला आहे पण त्याला मात्र विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन न दिल्यामुळे सध्या स्थितीत शेतात पऱ्हाटीचे पीक असून पाण्याअभावी पीक सुकून जात आहे. शेजारी पाणी असून सुद्धा पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा जीव तळमळत आहे. सध्या स्थितीत हा शेतकरी मानसिक त्रासात असून आत्महत्याचा विचार त्याच्या मनात घोळल्या जात आहे. याबाबत या शेतकऱ्याचे सामाजिक संघटनांनी समुपदेशन करणे गरजेचे आहे. असेच त्रस्त शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतात. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यातील आत्महत्या वाढीची कारणे पूढे येऊ लागतात.

 

 

 

या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने भविष्यात अशा गोष्टी घडू शकतात. या बाबीचा कोणीही विचार मात्र करत नाही. नंतर ही कुटुंबे उघड्यावर पडतात अशा बाबीची व अशा शेतकऱ्याची दखल खरच कुणाला घ्यावीशी वाटत नसावी का ! केवळ शासनाच्या धोरणाच्या गोष्टी सांगितल्या जातात मात्र या बाबीची वेळीच दखल घेतली नाही तर असे शेतकरी देशोधडीला लागतील.हे मात्र तितकेच खरे…. आणि वाशिम जिल्ह्याचा आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा कलंक निघणार नाही व तो कायम कलंकितच राहणार असे सद्यस्थितीत परिस्थितीवरून दिसते.

 

 

तो शेतकरी घराकडे परत जात असतांना सांगत होता. यामध्ये माझा दोष काय? मी तर वेळीच पैसे भरले होते. या शेतकऱ्याचे मन स्थिर नव्हते, हतबल झालेला होता. व धीर सुट्टा धीर सुद्धा सुटला होता. शासनाला व प्रशासनाला कायम दोष देत निघून गेला. आमचे जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील यांची यांनी त्यांची भेट घेऊन माहिती संकलन केली.