
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : सध्या स्थितीत विधानसभेच्या ‘आचारसंहितेचा’ कार्यकाळ सुरू झाला असून याबाबत बैठकीला पत्रकार बांधवांना विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा घेऊन माहिती देण्यात आली. रिसोड risod विधानसभा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर vaishali devkar मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा तेजनकर, दीपक पुंडे तहसीलदार मालेगाव, सतीश शेवदा मुख्याधिकारी नगरपरिषद रिसोड, यांचे उपस्थितीत रिसोड येथील तहसील कार्यालयात दिनांक १६/१०/२०२४ रोजी दुपारी पत्रकार परिषद पार पडली.
यामध्ये माहीती देतांना सांगितले की तालुक्यातील सर्व बूथ तयार झाली असून यासाठी उमेदवाराचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग असेल. पत्रकारासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येईल यासाठी सर्व बंदोबस्त सुद्धा घेण्यात येईल दरम्यान दिव्यांगासाठी सुद्धा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील मतदारांच्या संख्येनुसार सर्व बुथ तयार करण्यात आले. असून मतदारसंघानुसार ची संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. जवळपास साडेतीन हजार कर्मचारी या कामी लागणार आहेत. या मतदारसंघातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख २३ हजार ६२३ एकूण मतदार आहेत त्यापैकी एक लाख ६८ हजार ३७७ पुरुष मतदार आहेत महिला मतदार म्हणून एक लाख ५५ हजार २४०, तर दिव्यांग मतदार म्हणून २८३४ मतदार आहेत.
८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार ३६,००८ आहेत. रिसोड मतदारसंघात एकूण मतदान केंद्र ३५० ची संख्या आहे.तर रिसोड तालुका मतदान केंद्रामध्ये १८२ केंद्र आहेत तर शहरातील ३० आणि ग्रामीण १५२, मालेगाव तालुका मतदान केंद्र एकूण १६८, शहरी १८, तर ग्रामीण १५०, यासाठी लागणारे एकूण क्षेत्रीय अधिकारी ३५, एकूण पोलीस क्षेत्रीय अधिकारी ३५, एकूण पोलीस स्टाफ १४५०, विविध पथके एस एस टी ५, एफ एस टी ६,व्ही एस टी ६, यासाठी लागणारी एकूण वाहने एसटी बस ३८, जीप ६९, अशीच सर्व यंत्रणा यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहे.
दरम्यान निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबर २०२४, निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४, नामनिर्देशक पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक २९ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्राच्या छाननीचा दिनांक ३० ऑक्टोबर, उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक ४ नोव्हेंबर, मतदानाचा दिनांक २० नोव्हेंबर, मतमोजणीचा दिनांक २३ नोव्हेंबर, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक २५ नोव्हेंबर असणार आहे. अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.