छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा पडल्या बाबत निवेदन.

 

 

नारायणराव आरु पाटील, वाशिम /प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग, सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केलेले होते.भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असतांना फक्त नऊ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे.

 

 

 

त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली,कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे.या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे.

 

 

आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही, तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अवमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल. त्यामुळे ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी… यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, जिल्हा प्रवक्ता विकास देशमुख,शेख इसाक, जिल्हा सचिव, गजानन खंदारे सोशल मीडिया प्रमुख, संघटक गजानन व्यवहारे, इत्यादी मंडळी मा.जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन देतांना उपस्थित होती.