ग्रामीण भागातही जमीन के तारे..

 

नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी 

 

कोणत्याही शहरात जास्तीत जास्त खेळाडू तयार होणे त्या मागची कारणे अशी आहेत की त्यांना सुख -सुविधेची कोणतीही कमतरता नसते, पैशाची गरज पडल्यास कमतरता न भासने,अशा विद्यार्थ्यांना खूप सुविधा मिळतात परंतु ग्रामीण भागातील कष्टकऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाला कोणत्याही सुविधा नसतात परंतु तो जिद्दीच्या जोरावर, कोणत्याही खेळामध्ये पुढे जातो हे मात्र तेवढं सत्य आहे .

 

 

 

आपल्या घरची आर्थिक परिस्थिती कमजोर असली तरी जिद्द कायम ठेवून पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करतो, त्याप्रमाणेच खडकी सदार येथील स्वर्गीय किसनराव सदार विद्यालय खडकी सदार या शाळेतील वर्ग दहाव्या वर्गात शिकत असलेला देवानंद वसंता सुरोशे हा विद्यार्थी बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून विजयी होऊन देवानंद सुरोशे याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरता निवड झाली याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या अशाच होतकरू मुलाला बळ देण्याचे काम जवळील शिक्षकांनी व इतर सहवासात असलेल्या लोकांनी दिले तर ग्रामीण भागातील मुले ध्येयापर्यंत पोहोचण्यास उशीर लागणार नाही.