नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील पेनबोरी येथील रहिवासी विलास विश्वनाथ आप्पा चवरे यांनी गेल्या ३ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.उपोषणामध्ये त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता होता.परंतु गावातील एका व्यक्तीने त्यांच्या घरासमोर मोठा खड्डा केला खोदला आहे.त्यामुळे त्यांना व कुटुंबातील लोकांना घरात जाण्यासाठी रस्ता नाही.त्यामुळे त्यांच्या सर्व कुटुंबास मानसीक त्रास सहन करावा लागत आहे.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. रस्ता हिमूलभूत गरज आहे.परंतु त्याच बरोबर त्यांना घराकडे जाण्यासाठी रस्ता पण असणे जरुरीचे आहे.या उपोषणाला शेतकरी पुत्र राम इढोळे व डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी संयुक्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या व्यक्तीस ग्रामपंचायत व सचिव पाठीशी घालत आहे.
माझेकडे ८अ आहे ग्रामपंचायतने नोंद केली असून त्याची घर टॅक्स,व सर्व कर सुद्धा भरत आहे. संबंधित पंचायत विभागाने यांच्या उपोषणाची दखल घ्यावी.न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करु असे पाठींबा देतेवेळी सांगितले.