भोकरखेड येथे ऋषिपंचमी मोठ्या उत्साहात साजरी,

 

नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी

 

भोकरखेड येथील श्री. संत गजानन महाराज संस्थानमध्ये ऋषीपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री भक्ती विजय ग्रंथाचे वाचन करण्यात आले.उत्सवाचा समारोप ८ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी करण्यात आला. यानिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

 

 

दरवर्षी श्रावण महिन्यात भोकरखेड येथील श्री.संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी विजयग्रंथ श्रवणाचा लाभ घेतला. या सोहळ्याचा समारोप ऋषी पंचमीच्या दिवशी करण्यात आला. यानिमित्त भाविकांनी सकाळ पासूनच श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळीच श्रीचा अभिषेक करून सजवण्यात आले.

 

 

यावेळी भाविकांनी ‘गण गण गणात बोते’ चा गजर करून परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यानिमित्त संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने रात्री हरि किर्तन ह.भ.प.प्रभु महाराज राऊत यांचे अमृत्तवाणीतुन करण्यात आले.भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पासून भोकरखेड येथील मुख्य मार्गावर टाळ मृदुंगाच्या सोबत श्री ची मिरवणूक भव्य अशी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.

 

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संस्थान गोभणी, श्री ह.भ.प. गजानन महाराज खोरणे यांच्या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी नगरपरिषदच्या वारीत सहभागी होते. भोकरखेड येथील प्रतिष्ठित नागरिक मारोतराव रंजवे यांनी नगर भोजन दिले. दुपारी ३ वाजता पासुन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी परिसरातील भाविक भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

 

या कार्यक्रमासाठी परिश्रम पूढील मान्यवरांनी घेतले त्यापैकी ह.भ.प.रामेश्वर महाराज रंजवे,कुंडलिक गायकवाड, गजानन जाधव,डाॅ रामेश्वर रंजवे, डॉ आंबादास रंजवे, त्र्यंबक रंजवे,भागवत रंजवे, राधेश्याम रंजवे,पुरूषोत्तम रंजवे,ज्ञानेश्वर रंजवे ,शंकराव लांडगे इत्यादी सह सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.