वाशीम जिल्हा प्रतिनीधी/नारायणराव आरु पाटील
आज दिनांक २५/९/२०२४ ला वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड येथे तहसीलदार रिसोड यांना निवेदन देण्यात आले. त्यामधे भर जहागीर येथील अतिक्रमण धारक यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून २०/९/२०२४ रोजी गट नं.६१,६२,६३ क्षेत्र २२.७६ हे.आर.चे क्षेत्र अतिक्रमण काढून नियमितपणे करने संदर्भात नोटीस प्राप्त झाल्या त्या मध्ये त्याचे उभे पीक व पक्के घर ७ दिवसा मध्ये नष्ट करण्याची नोटीस बजावली. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी वाशीमचे जिल्हा अध्यक्ष अनिल गरकळ व अतिक्रमण धारक ४० ते ५० कुटुंबातील लोक आणि गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार रिसोड यांना २ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामपंचायत भर जहागीर ग्रामपंचायत समोर सामूहिक आत्मदहन करण्याचे निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ हे निवेदन देतांना असे म्हणाले की जर या लोकांचे शेतातील उभे पीक नष्ट केले आणि त्यामध्ये असलेली पक्की घरे जर नष्ट केली तर आम्ही अतिक्रमण धारक रस्त्यावर येऊ त्यामुळे ही कार्यवाही थांबवावी जर आपण याबाबत बाबीची दखल घेतली नाही तर दोन ऑक्टोबरला ग्रामपंचायत समोर सामूहिक आत्मदहन करू याबाबतचे निवेदन रिसोडच्या तहसीलदार यांचे सह वाशिम जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी रिसोड, ठाणेदार पोलीस स्टेशन रिसोड यांना या निवेदनाद्वारे अवगत केले. या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी असेही निवेदनात सांगितले.