washim : बस मधील प्रवाशांच्या मदतीला धावून आले पिंजर येथील आपत्कालीन पथकाचे जवान !

washim

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

washim : बार्शीटाकळी ते पिंजर मार्गावरील बार्शीटाकळी barshitakli जवळील 24 सप्टेंबर रोजी रात्री अंदाजे 8:00 वाजताची घटना पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथाकाच्या जवानांनी मानवता धर्म निभावून आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला… 24 सप्टेंबर रोजी अकोल्यावरुन पिंजर मार्गे कारंजा लाड karanja laad  जाणा-या जवळपास 50 प्रवाशांनी भरलेल्या महा मंडळाच्या बसला आग लागल्या सारखा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविले.

 

 

यामुळे प्रचंड घाबरून खाली उतरण्याच्या नांदात काही जणांचे हातपाय लचकले आणी बस मधील प्रवाशी सगळे सुखरूप खाली उतरले. यात दोन प्रवाशी ऑपरेशन करुन उपचार करून याच बस ने घरी परत जात होते तर काही शाळकरी मुली तर काही वयोवृद्ध प्रवाशी प्रवास करीत होते यात रात्र आणी पाऊस असल्याने पर्यायी वाहने नसल्याने संकटात पडले होते.

 

 

अशा या घटनेची माहीती मिळताच क्षणाचाही विलंब न करत मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन ‘शोध व बचाव पथकाचे’ प्रमुख दिपक सदाफळे सहकारी मयुर सळेदार, अंकुश सदाफळे,हर्षल वानखडे, हे आपल्या मल्टिपर्पज सर्च रेस्क्यु रुग्णवाहीकासह घटनास्थळावर मदतीला धावून आले यावेळेस दोन रुग्णांसह दहा ते पंधरा प्रवाशांना विनामूल्य पिंजर येथे पोहचुन दीले खरी मानव सेवा जिवनरक्षक सेवा काय असते या घटनेतुन पथकाचा हा मानवता धर्म रात्री प्रवाशांनी व वाहन चालकांनी काल अनुभवला बस चे वाहन चालक यांनी पथकाचे आभार मानले.