मंगरूळपीर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या फिरत्या पथकाची धाड टाकून कार्यवाही.

 

 

नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी 

 

दिनांक २२/८/२०२४ रोजी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय फिरते पथक मंगरूळपीर यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे मौजे ढिल्ली तालुका जिल्हा वाशिम येथील रहिवाशी श्री संदीप गोविंदा कऱ्हे यांचे राहते घरात धाड टाकून घरातून विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करून कटाई करून साठवणूक केलेले साग, कट साईज, गोलनग व साग तयार साहित्य दरवाजा, पल्ले व खिडक्या, पल्ले मिळून एकूण १.०२४ घनमीटर लाकूड मालासह सदर अवैध लाकडे कटाई करुन कट साईज बनवण्या करता वापरण्यात आलेले साहित्य

 

 

रंदा मशीन व इतर सुतार साहित्य मिळून अंदाजे ८० हजार ते एक लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी श्री संदीप गोविंदा कऱ्हे रा.ढिल्ली यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये, वनगुन्हा जारी करून कारवाई करण्यात आली. सदर कारवाईतील सर्व साहित्य वनविभागाने जप्त करुन ताब्यात घेऊन शेंदुरजना शासकीय लाकूड आगार येथे वाहतूक करून जमा ठेवले. सदर संपूर्ण कार्यवाही वाशिम वनविभागाचे उपवनसंरक्षक माननीय श्री स्वामी सर यांचे मार्गदर्शनात, तसेच

 

 

यवतमाळ वनवृत्ताचे विभागीय वनाधिकारी दक्षता श्री दिघोले सर, यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक मंगरूळपीर छत्रपती चव्हाण, क्षेत्र सहाय्यक राजू राठोड, क्षेत्र सहाय्यक एस. पी. राठोड सह अधिनिस्त फिरते पथक वनकर्मचारी, मानोरा वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी तसेच कारंजा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी एकत्रितरित्या यशस्वीरित्या पार पाडली. सदर प्रकरणी पुढील चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक मंगरूळपीर करीत आहेत.