Washim : मनमिळावू व्यक्तीमत्व केशव हरणे यांचे निधन.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील

 

वाशिम (Washim)- नजीकच्या चिखली घुले येथील रहिवासी व मनमिळाऊ स्वभाव असलेले केशव हरणे यांचे बुधवार, ३० ऑक्टोंबरच्या रात्री ११ वाजता ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते. ते घरातील एकमेव कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या अकाली जाण्याने परिवाराची मोठी हानी झाली आहे. ते येथील चर्तुभूज लॅब मध्ये कार्यरत होते. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांच्यावर चिखली घुले येथे वैद्यकिय क्षेत्रातील अनेकांसह गावातील नागरीकांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. केशवराव हरणे यांच्या सर्वचिंतकांनी हळहळ व्यक्त केली.