वाशीम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : स्थानिक वाशिम येथील श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथील विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती द्वारा ‘युवा महोत्सव’ २०२४-२५ “छात्र तरंग” यात लोककला आदिवासी ‘गोंड’ जमातीचे बहारदार “ढेमसा” dhemsa नृत्य सादर केले हे युवा महोत्सव अकोला येथील खंडेलवाल महाविद्यालयात संपन्न झाले. सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रसेनजित चिखलीकर हे युवा महोत्सवाचे व्यवस्थापन होते तर महिला व्यवस्थापक म्हणून प्रा.डॉ. मनीषा कीर्तने तसेच प्रा. पंढरी गोरे हे होते. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक adv. kiranrao naik तसेच महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष डॉ. स्नेहदीप सरनाईक dr. snehdeep sarnaik यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व प्रोत्साहन दिले.
आदिवासी ‘गोंड’ जमातीचे “ढेमसा” dhemsa नृत्यासाठी विद्यार्थ्यांनी मनमोहन अशी वेषभूषा व केशभूषा केली होती व यामुळे लक्ष वेधून घेतले व श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला व संर्वाचे लक्ष वेधून घेतले. यात महाविद्यालयातील बी.एस.डब्ल्यू. च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष तसेच एम.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यात जयश्री भडांगे, साक्षी गिरी, श्रीकृष्ण अटपलकर, अभिषेक मानवतकर, संकेत गोटे, करण विटकरे, विकास गिरी तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये साक्षी गिरी या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय साळीवकर, माजी प्राचार्य डॉ. किशोर वाहाणे, डॉ. पंडित नरवाडे, डॉ. वसंत राठोड, डॉ. संजय साळवे, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. भारती देशमुख, डॉ. गजानन हिवसे, डॉ. रवींद्र पवार आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.