आमदार अमित झनक यांची मेडशी येथे विमा प्रतिनिधी सोबत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

अमित झनक

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधि नारायणराव आरु पाटील

 

आमदार अमित झनक यांची मेडशी येथे विमा प्रतिनिधी सोबत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी… दिनांक २३सप्टेंबर २०२४ रोजी आमदार अमित झनक amit zanak हे मालेगाव malegaon तालुक्यातील मेडशी medashi भागातील अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन व इतर पिकांचे मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी आले.आणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले असता त्यांनी भारतीय ‘पिक विमा’ कंपनीचे तालुका प्रतिनिधी योगेश आरू आणि सुरेश आढाव यांना बोलवून सुरू असलेल्या पीक पंचनामाबद्दल योग्य ती माहिती भरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे याबाबत सविस्तर चर्चा केली व योग्य प्रकारे सर्वे करावे यासाठी सूचना दिल्या जर एखादा सर्वे मध्ये गैरप्रकार करतांना आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गावाचे सरपंच आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.