नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २१/८/२०२४ एस.सी., एस.टी. यांनी भारत बंदची हाक दिली त्यांच्या समर्थनार्थ रिसोड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीने याबाबतचे निवेदन रिसोड तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन दिले हे निवेदन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यापर्यंत पोहोचवावे या आशयाचे निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून उपेक्षित समूहाच्या लोकांना न्याय देण्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आधार दिल्यामुळे सर्वांचे जीवन मानसन्मानाने उंचावत गेले. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी नेहमीसाठी वंचीतासाठी आवाज उठवला परंतु सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशाच्या खंडपीठाने एस. सी.,एन. टी. या आरक्षणाबाबत वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला तो रद्द करण्यासाठी रिसोड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी कडून रिसोडच्या तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे पर्यंत निवेदन पोचविण्यात यावे ही विनंती रिसोड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी रिसोड विधानसभेचे वंचित चे नेते प्रशांत गोळे,तालुकाध्यक्ष सय्यद अकिल, उपाध्यक्ष रंगनाथ धांडे,शहर अध्यक्ष मोहम्मद आसिफ, सय्यद नाझीम, गिरीधर शेजुळ, महेश तिडके प्रदीप खंडारे,सदानंद गायकवाड, संतोष जुमडे, कांतीराम मोरे, के.एन.तुरुकमाने, गोपाल परीस्कर, अभिषेक सपकाळ , सुमित पाचरणे, अक्षय सपकाळ, हिमेश, सुरेश धबडघाव यास अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी, इत्यादी उपस्थित होती