शिक्षकानेच केला अश्लिल व्हिडिओ दाखवत इयत्ता ८ वी च्या ६ मुलींचा विनयभंग. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना.

 

 

 

ठाण्यातील बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुली वर झालेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केल्या जात असताना अशातच अकोला मधून आणखी एक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांसाठी गुरू मानल्या जाणाऱ्या शिक्षकानेच वर्गातील सहा मुलींचा विनयभंग करत छळवणूक केली आहे.

 

 

 

सविस्तर वृत्त असे की अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे हि घटना घडली असुन या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूरच्या घटनांनंतर आता अकोल्याच्या शाळकरी मुलींवर अत्याचार झालेल्या घटनेने अकोल्या मध्ये या गोष्टींचा संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार काजीखेड येथील शाळेमध्ये इयत्ता आठवी मध्ये असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना आरोपी शिक्षक  प्रमोद सरदार अश्लिल व्हिडिओ दाखवायचा. एवढंच नव्हे तर तो शिक्षक ईतकयावर न थांबता मुलींना चुकीच्या हेतुने त्यांना स्पर्श करत त्यांच्यासोबत अश्लिल संभाषण सुध्दा केलं.

 

 

 

संबधीत मुलींनी या घटनेबद्दल घरच्यांना सांगितले असता तेव्हा या शिक्षकाच्या किळसवाणा कृत्याचं बिंग फुटलं त्यानंतर गावातील सर्व नागरिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांनी ताबडतोब शाळेच्या दिशेने धाव घेतली व शिक्षकाच्या किळसवाण्या कृत्याचा निषेध केला. या घटनेने अकोला शहरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन सविस्तर प्रकरणाची माहिती घेतली. ज्यांचा नाकाखाली आरोपी शिक्षकाचा हा लाजिरवाणा व किळसवाणा छळवणुकीचा खेळ सुरू होता या सर्वांवर पोस्को अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आशा मिरगे यांनी केली.