uddhav thackeray : लोक माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुख anil deshmukh यांनी सांगितले की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस devendra fadnvis यांचे डाव होते, पण हे सगळे सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे. मी तडफेने उतरलोय, तेव्हा एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन,’ असे आव्हान उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी बुधवारी दिले.
शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गीतेमध्ये हेच सांगितले आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिले की, सगळे नातेवाईक त्याच्या विरोधात युद्धभूमीवर उभे ठाकले आहेत. यातना होणे स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसे आहेत.
हे शेवटचे आव्हान
हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणारे कोणी राहणार नाही. ‘शिवसेना’ ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.