
मोताळा येतील ग्रामीण रुग्णालयात डॉटर वेळेवर येत नसल्याने वंचित बहुजन आघाडी vanchit bahujan aghadi च्या वतीने आंदोलन ! येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे येथील डॉक्टरांना वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या vanchit bahujan aghadi वतीने ३१ जुलै रोजी आंदोलन करण्यात आले. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून येथे बांधण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय काय फायद्याचे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला होता.
‘ग्रामीण रुग्णालयात’ यावेळी डॉक्टरांची शोध मोहिमही राबविण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाही. त्यामुळे आयुषच्या डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करावी लागत आहे, हे एकप्रकारे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार असून, तो थांबविण्यातयावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आला. समस्या न सोडवल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी प्रशांत वाघोदे, तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे, दिलीप वाकोडे, नवनीत सिरसाट, प्रतिभा थाटे, अनिता सिरसाट, संजय खराटे, संदीप गवई, व सहकाऱ्यांनी दिला आहे.
‘रेफर टू’ वाढले!
गरज नसताना रुग्णांना बुलढाणा येथे रेफर केले जात आहे, तरी रेफर टू बुलढाणा buldhana चे ऑडीट करण्यात यावे. रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयातून औषध विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात यावा, आदी मागणीही यावेळी करण्यात आली.