Typing,shorthand course freee :संगणक टायपिंग अभ्यासक्रमासह शॉर्टहॅण्डचाही कोर्स आता मोफत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून – हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य दिले जाईल. याबाबत अमृत संस्थेची करार झाला असून, लवकरच सारथी, बार्टी, महाज्योती : या संस्थांशीही करार केला जाणार आहे.
सध्या ही योजना अमृत संस्थेच्या • माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू आहे. ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था,महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना हे अर्थसहाय्य मिळेल. लवकरच सारथी, महाज्योती, बार्टी तसेच आदिवासी संशोधन संस्थेशीही करार करून विविध मागास घटकांतील अर्थसाहाय्य जाईल.
विद्यार्थ्यांनाही दिले संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा तसेच ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हे अर्थसाहाय्य दिले जाईल. जूनच्या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही ही मदत मिळणार आहे. टायपिंग(typing) व शॉर्टहॅण्ड (shorthand) परीक्षेत दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळेल.
कुणाला किती अर्थसाहाय्य | Typing,shorthand course freee
टायपिंगसाठी Typing ६,५००:
जीसीसी-टीबीसी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ४८००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी ६,५०० रुपये मिळतील.
शॉर्टहॅण्डसाठी Shorthand ५,३००:
■ लघुलेखन कोर्स उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ३६००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी ५,३०० रुपये मिळतील.