वर्धा येथे शिक्षकांचे राज्यव्यापी जुनी पेन्शन लागू करणे संदर्भात आमरण उपोषण.

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील     

 

वर्धा येथे जुनी पेन्शन च्या मागणीसाठी २ ऑक्टोबर २०२४ पासून राज्यव्यापी आमरण उपोषणाला बसलेले शिलेदार वितेश खांडेकर, गोविंद उगले, नदीम पटेल, शैलेश राऊत, संजय सोनार, विक्रम राजपूत, अभिजीत पाटील बोरकर,मोहन सोनटक्के, प्रवीण बहादे, डॉ. प्रशांत विघे, राजीव गावंडे, भारत पारखे, प्रमोद खोडे, अरविंद सुरोशे, मोगलाजी जोगलेवार , श्याम प्रसाद बांगर, डॉ. श्रीकांत भोवते इत्यादी शिक्षक आपल्या इतर बांधवासाठी व सर्वांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे असलेले

 

 

 

जुनी पेन्शन योजना सन २००५ पासून लागू नसल्याने भविष्यातील अंधार या सर्व शिक्षक लोकांना दिसत असताना शासन मात्र डोळे झाक करत असल्याचा उपोषणाला बसलेल्या शिक्षकांचा आरोप आहे त्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरी शासनाने या बाबीची दखल घ्यावी व सर्व शिक्षकांना व कुटुंबाला न्याय मिळेल यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठीच वर्धा येथे राज्यव्यापी आमरण उपोषण चालू आहे.