
nagpur crime : गावात काम नसल्याने पतीसह चार महिन्यांअगोदर नागपुरात nagpur आलेल्या एका मजूर महिलेवर तिच्या परिचयातील वासनांध व्यक्तीने अत्याचार atyachar केल्याची बाब समोर आली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील या महिलेवर आरोपीने दोनदा ‘अत्याचार’ करत कुणालाही काही सांगितल्यास त्याचे वाईट परिणाम होतील व मुलांना जिवे मारेन, अशी धमकी dhamki दिली होती.
कपिलनगर पोलिस ठाण्याच्या kapilnagar police station हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपीचे नाव घनश्याम प्रीतीलाल पटले ghanshyam pritlal patle (भीलगाव) असे आहे. संबंधित महिला पूर्व विदर्भातील एका खेडेगावातील रहिवासी असून, तेथे हाताला काम नसल्याने पतीसोबत चार महिन्यांअगोदर नागपुरात nagpur आली. पती खासगी काम करू लागला व महिलेने मजरी करण्यास सरुवात केली. घनश्यामशी ghanshyam तिचा कामाच्या माध्यमातून परिचय झाला. २५ जून रोजी ती काम करत असताना तिच्या साइटवर पटले पोहोचला. यावेळी कामाच्या ठिकाणी कुणीच नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला तिने विरोध केला असता, त्याने तिला मारहाण केली व कुणालाही काही सांगितले, तर गंभीर परिणाम होतील व तुझ्या मुर्लाना ठार मारेन, अशी धमकी दिली.
या प्रकाराने हादरलेल्या महिलेने पतीला या प्रकाराची माहिती दिली. मात्र काम जाईल, या भीतीपोटी दाम्पत्याने शांत राहण्याचा निर्णयघेतला, मात्र आरोपी पटलेची हिंमत वाढली. तो थेट महिलेच्या घरी पोहोचला व तिच्यावर परत अत्याचार केला. महिलेने पतीला सांगितल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो महिलेला घेऊन थेट यशोधरानगर पोलिस ठाण्यात yashodhanagar police station पोहोचला. त्याठिकाणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घनश्याम पटलेविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ६४ (१) व अनुसूचित आती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.