रामदास कहाळे / सिंदखेडराजा प्रतिनिधी
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कार्यालयात कधी येतात आणि कधी जातात हे मात्र जनतेला दिसून येत नसल्यामुळे आणि त्यातही दोन नायब तहसिलदार रजेवर असल्याने तहसील कार्यालय वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येत आहे मात्र तालुक्यातील जनता मात्र त्रस्त झाली आहे.
विधासभा निवडनुक तोंडावर येवून ठेपली असताना महविकास आघाडी आणि महायुती चे अनेक इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठी भेटी गावात जावून घेत आहेत मात्र त्यांना तालुक्यातील जनता तहसील कार्यालयात अनेक कामासाठी त्रस्त असताना मात्र त्याचे तहसील कार्यालयातील तहसीलदार तथा ईतर अधिकारी रजेवर असल्यामुळे जनतेची कामे रखडली आहेत त्या कडे त्यांचे मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे .
या गंभीर विषयाकडे ना कोणाचेही लक्ष नाही अशातच आज तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या विषयी माहिती जाणून घेतली असता असे समजले की तहसीलदार रुजू झाल्यापासून त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे .वास्तविक पाहता स्थानिक बुलढाणा तहसीलदार यांच्याकडे पदभार देण्या ऐवजी 100 किमी अंतरावर असलेल्या सिंदखेड राजा तहसील चे तहसीलदारांच्या कडे पदभार का म्हणून देण्यात आला असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत.
एकंदरी या ठिकाणी लाईट गेल्या वर इन्व्हर्टर सुद्धा ते बंद अस्वस्थेत आहे नेमके बंद असण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले के सदर इन्वर्टर व्हिडिओ कॉन्फरन्स साठी आहे व्हिडिओ कॉन्फरन्स साठी मिळालेले इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतरही वापरात येत नाही त्यामुळे लाईट गेल्याचे कारन समोर करून कर्मचारी मोकळे होत आहे एकंदरीत तहसील कार्यालय वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत असून एकमेव निवासी नायब तहसिलदार अस्मा मुजावर मॅडम ह्या तहसील कार्यालयाचां कारभार सांभाळत आहेत