Sindkhedraja news : शेंदुर्जन ते साखरखेर्डा रोडवर असलेल्या तांदुळवाडी गावातील तरुणाने गोरेगाव फाट्याजवळ शेंदुर्जन रोडवर निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २२ जुलै रोजी घडली. तांदुळवाडी येथील मनोहर भिवाजी जाधव वय ३५ वर्षे हा तरुण काम धंदे करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा, परंतु काही दिवसापासून मनोहर जाधव हा तणावात वावरत होता, शिवाय पत्नी व दोन लहान लहान मुले सुद्धा जवळ नसल्यामुळे मनोहर जाधव हा नेहमीच एकांतात राहायचा.
तरीसुद्धा त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला तणावातून मुक्त करण्याचे बरेच प्रयत्न केले परंतु ते प्रयत्न अपयशी ठरले, २२ जुलै च्या रात्री १० वाजून १७ मिनिटांनी गोरेगाव फाट्याजवळ शेंदुर्जन रोडवर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला मनोहर जाधव याने गळफास लावून आत्महत्या केली, घटनेची माहिती मिळताच बीड यांनी जमदार रामदास वैराळ घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे पाठवण्यात आले होते, त्यानंतर दुपारी मनोहर जाधव यांच्यावर तांदूळवाडी येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर जाधव या तरुणाचे आई वडील अगोदरच वारलेले आहे, मनोहरला दोन भाऊ पत्नी व दोन लहान मुले आहेत, पोलिसांनी प्रकरण मर्ग दाखल केले असून पुढील तपास ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास वैराळ करत आहेत,