“मी तुला आतून बाहेरून ओळखतो…”; पक्षातून हकालपट्टी झाल्यावर रविकांत तुपकारांच ट्विट!

Ravikant tupkar

 

सय्यद सलमान सय्यद नसीम  – (kattanews network)    : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

“संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो,

पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो”….

“माहिती आहे मला पुढची तुझी खेळी,

मी तुला आतून बाहेरून ओळखतो”..

 

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी ट्विट केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. “संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो”, असं रविकांत तुपकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी सुरेश भट यांची “विझलो जरी आज मी…” या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत.दरम्यान, २२ वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जिवाचं रान केलं, त्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून असा निर्णय धक्कादायक आहे.

 

 

राजू शेट्टी आणि माझ्यामध्ये का दुरावा निर्माण झाला हे मला माहिती नाही. कांदा आणि धानासाठी आंदोलन केले ही आमची चूक आहे का? असा सवाल करत राजू शेट्टी असा निर्णय घेतील असं मला अपेक्षित नव्हतं. २४ तारखेला आम्ही बैठक बोलावली आहे, त्या बैठकीत पुढील निर्णय घेणार आहोत, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.