अजित पवार यांना सिंदखेड राजा संघातून मोठा धक्का.. डॉक्टर शिंगणे फुंकणार तुतारी.

सिंदखेड राजा मतदारसंघ

 

 

सिंदखेडराजा/प्रतिनिधी 

 

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवा, असा ९९ टक्के कार्यकर्त्यांचा सूर आहे. सिंदखेड राजा (sindkhedraja) विधानसभा मतदारसंघापुरता नसल्याने जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांची मतेदेखील मला जाणून घेऊ द्या, दोन दिवसांत याबाबतचा निर्णय सांगतो, असा शब्द आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात आज दिला. कार्यकर्त्यांनी घातलेली साद पाहता आ. राजेंद्र शिंगणे (dr.shingane) शरद पवार गटात जावून अजितदादा पवार यांना मोठाच धक्का देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

 

बरेच दिवसापासून चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सिंदखेडराजा विधानसभा निवडणूक संदर्भात त्याचबरोबर आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांनी कोणत्या पक्षात गेली पाहिजे यासाठी 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची महत्त्वाचे बैठक झाली या बैठकीत सर्वच कार्यकत्यांनी शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली माजी मंत्री आ डॉ राजेंद्र शिंगणे यांना पत्रकारांनी प्रश्न केला आजच्या बैठकीत बावत प्रश्न उपस्थित करुन आपण काय निर्णय घेतला यावर ते म्हणाले की,

 

काय म्हणाले डॉ.शिंगणे..?

 

आमचे घराणे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून काम करीत आले आहे. यापुढेही तोच समतेचा विचार सोबत ठेवून आपण चालणार आहोत. माझी आणि अजित पवार यांची एक महिन्यापासून भेट झाली नाही परंतू शरदचंद्र पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली आहे मी महायुती सरकार सोबत बँकेला मदत मिळावी म्हणून गेलो होतो सरकार जमा झालो नव्हतोया मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी मला तुमची गरज आहे निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवावी हा निर्णय घेण्यासाठीआजची बैठक आयोजित केली होती 16 ऑक्टोबर रोजी सिंदखेडराजा येथे झालेल्या बैठकीत उपस्थितीतांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली पाहिजे असे मत व्यक्त केले.

 

 

मिटकरी यांची टिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मिटकरी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून टीका करताना म्हटले आहे की, बुडालेल्या जिल्हा बँकेला दिला ज्यांनी थारा…. दादाच्या आशीर्वादाने निधीचा कोट्यावधी पसारा.. टच्च फुगलंय पोट निघतोय तुतारीच्या दारा… भोवती सगळा फिरतोय माझ्या ठेकेदारी पसारा स्वार्थासाठी जिथे गगण ठेंगणे ते हे महाभाग डॉ. राजेंद्र शिंगणे अशा प्रकारची पोस्ट केली आहे.

 

 

 

मतदार संघाला मदत मिळावं म्हणून केला होता प्रवेश.

त्यामुळे येत्या दोन दिवसात मी निर्णय घेणार आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले की उध्दव वकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले ते सर्वांसाठी समान न्याय देण्याची सक्षम भुमिका साकारणारे निर्णय घेतले 2022 ला शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यामुळे आमची कोणतीही कामे होत नव्हती, अखेर अजित पवार यांनी सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला मी पाठींबा दिला तो केवळ बँकेला मदत मिळावी म्हणून, त्यानंतर खरया अर्थाने मतदार संघाला विकास निधी मिळाला. असेही त्यांनी सांगितले. उपस्थित कार्यकत्यांची मते जाणून घेतली असता सर्वच कार्यकत्यांनी तुतारी असा गगणभेदी आवाजाने शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी सिंदखेड राजा तालुक्यातील त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.

 

येत्या एका दिवसात भूमिका जाहीर करणार.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघापुरता नसल्याने जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांची मतेदेखील मला जाणून घेऊ द्या, दोन दिवसांत याबाबतचा निर्णय सांगतो, असा शब्द आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात आज दिला. कार्यकर्त्यांनी घातलेली साद पाहता आ. राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात जावून अजितदादा पवार यांना मोठाच धक्का देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.