अखेर मुहूर्त ठरला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार येणार बुलडाण्यात.

 

 

बुलडाणा प्रतिनिधी

 

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत व बुलढाणा शहरामध्ये एकूण २२ महापुरुषांच्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा १९ सप्टेंबर रोजी होणार व त्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची हजेरी लागणार असल्याची माहिती  आ. संजय गायकवाड यांनी 6 सप्टेंबर रोजी मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार सभेत दिली.

 

 

बरेच दिवसापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेले महापुरुषांचे स्मारके पूर्ण झालेले होते. एकूण २२ महापुरुषांचे पुतळे बुलढाणा शहरांमध्ये बसवण्यात आलेले आहेत. बरेच दिवसापासून शहरवासीयांना प्रश्न निर्माण झाला होता की महापुरुषांच्या स्मारकांचे अनावरण केव्हा होणार..? परंतु दोन वेळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तारीख समोर ढकलल्यामुळे या स्मारकाचे अनावरण होऊ शकले नाही, आता मात्र 19 सप्टेंबर या रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते या महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण होणार असल्याची माहिती आ.संजय गायकवाड यांनी सांगितले.

 

 

आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री १०:३० वाजता हेलिकॉप्टरने बुलढाण्यात येणार व सकाळी 10:40 ते 12:30 पर्यंत एकूण 22 महापुरुषांच्या स्मारकांचे अनावरण मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी केले.