उद्धवसेनेच्या मलकापूर शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी ! दिल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात उपसरपंचासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्शनगरमधील श्री संत गजानन महाराजांच्या shree gajanan maharaj मंदिरसमोरील नाली करण्यासाठी एक वर्षापूर्वी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत यांनी सिमेंट काँक्रिटचा रस्ता खोदला. रस्ता खोदकाम करताना खोदकामाच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकून रस्ता सपाटीकरण करून देण्याचे राजपूत यांनी स्थानिक रहिवाशांना दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनसुद्धा रस्ता सपाटीकरण केला नसल्याने या रस्त्यावरून ये-जा करताना अनेक अपघात घडले आहेत.
भीक मांगो आंदोलनाचा इशारा
बुधवारी सायंकाळी उद्धवसेनेचे शहरप्रमुख ‘गजानन ठोसर’ यांनी भ्रमणध्वनीवरून खोदलेल्या रस्त्याचे सपाटीकरण न केल्यास “भीक मांगो आंदोलन करू, असा इशारा दिला. त्यावेळी उपसरपंच राजपूत यांनी भ्रमणध्वनीवरच ठोसर यांना शिवीगाळ केली. तसेच दोन- तीन समर्थकांसह हातात तलवारी, लाठ्या-काठ्या, पाइप घेऊन ठोसर यांच्या घरावर हल्ला केला. याबाबतची माहिती वर्षा ठोसर यांनी देताच गजानन ठोसर यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.