Dikshabhumi : २३ जनावर गुन्हा ; महिला पोलिसाला धक्काबुकी आणि शवीगाळ केल्याचा ठपका !

Dikshabhumi

Dikshabhumi : भूमिगत नेटवर्किंगच्या bhumigat networking बांधकामाला विरोध करण्यावरून १ जुलैला दीक्षाभूमी परिसरात आंदोलन झाले. यावरून बजाजनगर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात २३ आंदोलनकर्त्यांची नावे आहेत. गुन्हे दाखल असलेल्यांनी बेकायदेशीरपणे एकत्र येत जमावाला भडकावले, तसेच पोलिसांना शिवीगाळ केली. महिला पोलिसाला खाली पाडत धक्काबुक्की केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

 

 

 

पार्किंगच्या बांधकामाला विरोध असल्याने ‘आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन’ केले व बांधकाम बंद पाडले. आंदोलनानंतर दोन दिवसांपासून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला. या घटनेनंतर पोलिस शिपाई आणि एका महिला पोलिस शिपायाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले. विकासकामाच्या साहित्याची तोडफोड, मजुरांच्या झोपड्यांची जाळपोळ करणे, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अडविणे, इतरांना चक्काजाम करण्यासाठी प्रवृत्त करणे, यासाठी गुन्हा नोंदविण्यात आला.