शेगाव |४ एप्रिल २०२६
शेगावात महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ‘चल एन्जॉय करू’ असे म्हणत महिलेचा विनयभंग केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीसह उपचारासाठी शेगाव येथे आली होती. उपचारानंतर परतत असताना ती मित्राच्या मोटारसायकलवरून पुढे गेली. मात्र चावी पतीकडे राहिल्याने ती गावाजवळील फाट्यावर उतरली. याच वेळी आरोपी रतन सुरेश दाभाडे (रा. पाडसूळ, ता. शेगाव) तेथे आला.
आरोपीने महिलेस अश्लील प्रस्ताव देत ‘तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत, शेगावला चल आपण एन्जॉय करू’ असे म्हणत तिचा हात पकडला आणि नको ते कृत्य केले.
घटनेदरम्यान पीडितेचे पती आणि साक्षीदार घटनास्थळी पोहोचले असता पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. यावर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ३५२, ३५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
👉 Related News:
- Breaking: बुलढाण्यात 4 नवीन महसूल कार्यालयांना मंजुरी; साखरखेर्डा, डोणगाव, लाखनवाडा केंद्रस्थानी, नागरिकांना मोठा दिलासा
- विश्वासघात! हॉटेल नोकरानेच केली चोरी; खामगावमध्ये ३ लाखांचा माल लंपास, २४ तासांत अटक
- धक्कादायक! 10 हजारांची लाच घेताना खामगाव पंचायत समितीत ग्रामसेवक रंगेहात जेरबंद
👉 Call To Action (CTA): अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.












