मुंबई /प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shaha) यांनी महाराष्ट्रातील मित्रपक्षांना सूचक इशारा देत राजकारणात नवा भूचाल घडवला आहे. “भाजपाला (BJP) कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे!” असं ठणकावत त्यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांचा सूपडा साफ करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा चांगलीच रंगली आहे.
अमित शाहांचा इशारा – “भाजपा स्वतःच्या बळावर सक्षम”
अमित शाहा म्हणाले,
“महाराष्ट्र में बीजेपी किसी के सहारे नहीं चलती। अपने बूते पर खड़ी है। भारतीय जनता पार्टी के सिद्धांत और कार्यसंघटन ने देशभरात मजबूत स्थान मिळवलं आहे. आता महाराष्ट्रातही BJP एक स्वतंत्र शक्ती म्हणून उभी आहे.”त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, राज्यात केवळ डबल इंजिन सरकार नव्हे, तर ट्रिपल इंजिन सरकार आवश्यक आहे.
म्हणजे तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्व पातळीवर BJP चं शासन असावं अशी त्यांची भूमिका होती.
हेही वाचा.
हवामान विभागाचा इशारा! पुढील 24 तास घराबाहेर पडू नका – 55 किमी वेगाने वारे व मुसळधार पाऊस.
विरोधकांचा सूपडा साफ करा” – शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
अमित शाह यांनी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं, “इतक्या ताकदीने लढा की विरोधक दूरबीन घेऊन शोधले तरी दिसू नयेत!”
त्यांनी राज्यातील आगामी ZP, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचं आवाहन केलं.
अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या महायुती राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा स्वतःच्या बळावर लढण्याचा संदेश देताच, अनेक नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की हा इशारा नेमका कोणत्या मित्रपक्षाला उद्देशून दिला गेला?










