गंगाधर बोरकर/प्रतिनिधी
अमरावती : अंशतः अनुदानित शाळांना १ जानेवारी २०२४ पासून वाढीव टप्पा अनुदान द्यावे,या बाबत तात्काळ जी. आर.काढावा,त्रुटी पूर्ण केलेल्या सर्व तुकड्या, शाळांना समान वाढीव टप्पा अनुदान द्यावे,पुणे स्तरावर अघोषित शाळांना घोषित करून अनुदान द्यावे,जूनी पेन्शन योजना लागू करावी,अंशतः अनुदानित शिक्षक,कर्मचारी यांना १०० टक्के अनुदानित शिक्षका प्रमाणे सेवा संरक्षण द्यावे, १५ मार्च२०२४ चा संच मान्यतेचा घातक निर्णय रद्द करावा,इतर खाजगी शाळे प्रमाणे अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना सुद्धा वैद्यकीय बिलाचा लाभ मिळावा.
आदी मागण्यासाठी अंशतः अनुदानित शिक्षकांचा सोमवारी दिनांक १२ ऑगस्ट रोजी अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा म.रा.का. विनाअनुानित कृती समती, खाजगी प्रार्थमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक, विनाअुदानित,अंशतः अनुदानित, अनुदानित, व मुख्याध्यापक संघ आणि शिक्षक समन्वय संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
तत्पूर्वी अनेक शिक्षक उप संचालक कार्यालया समोर मुंडण आंदोलन करतील.अशी माहिती कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय संघटक उपेंद्र पाटील यांनी दिली.
राज्यभर तालुका, जिल्हा,विभाग स्तरावर विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. अमरावती विभागात हे आंदोलन सोमवार दिनांक ५ ऑगस्ट पासून तीव्र करण्यात आले आहे.सोमवारी दिनांक ५ ऑगस्ट रोजी सर्व तालुका ठिकाणी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
दिनांक ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान वाशीम येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन ,ढोल बजाव आंदोलन केले.सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शिक्षण उप संचालक कार्यालय अमरावती येथे मुंडण आंदोलन व भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात विविध शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ,शिक्षक समन्वयक संघाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
तरी या आंदोलनात अमरावती विभागातील शिक्षक, कर्मचारी यांनी मोठया संख्येने सामील व्हावे.असे आवाहन कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय संघटक उपेंद्र पाटील,विभागीय अध्यक्ष सुधाकर वाहुरवाघ, सुरेश सिरसाठ,बाळकृष्ण गावंडे,दीपक देशमुख, आर.एम.पठाण,विजय देशमुख,भैरव भेंडे,विनोद इंगळे,सुनील देशमुख,गोपाल चव्हाण आदींनी केले आहे पत्रकार परिषदेला पुरुषोत्तम कळसकार ,सुमित्राबाई पाटील ,अजय वाणे उपस्थित होते. या आंदोलनामध्ये स्वराज्य शिक्षक संघ ,शिक्षक महासंघ , शिक्षण संघर्ष संघटना,उच्च माध्यमिक शिक्षक संघटना ,शिक्षकेतर कर्मचारी संघटनाचे अमरावती विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे