विजय जुंजारे,रिसोड/प्रतिनिधी :-
सरदार पटेल जयंती, वॉक फॉर युनिटी, रिसोड पोलीस आणि राष्ट्रीय एकता दिन या चारही संकल्पनांचा संगम घडवत रिसोड शहरात भव्य वॉक फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सरदार पटेल जयंतीनिमित्त ही रॅली वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या पुढाकाराने पार पडली.
३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता उत्तमचंद बगडिया महाविद्यालयातून हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, डॉ. अशोक इंगोले (अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन), रवी अंभोरे (अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ), सतीश शेवदा (मुख्याधिकारी नगरपरिषद रिसोड), प्रतिष्ठित नागरिक बबनराव मोरे, मंचकराव देशमुख, डॉ. विनोद कुलकर्णी (प्राचार्य उत्तमचंद बगडिया महाविद्यालय), संतोष आघाव (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा.
रिसोड तालुक्यात बूथ वाढ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत १६ नवीन मतदान केंद्रांची निर्मिती.
ही वॉक फॉर युनिटी रॅली बगडिया महाविद्यालय, जिजाऊ चौक, हिंगोली रोड, माणुसकी नगर, संत गजानन महाराज मंदिर, पंचायत समिती व शिवाजी हायस्कूल मार्गे पुन्हा बगडिया महाविद्यालयात परत आली.
रॅलीदरम्यान नागरिकांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीमय केले.प्रसंगी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थाने एकत्र आणून भारताला एकसंघ ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांचे निर्णय राष्ट्रहिताचे, धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण असल्याने त्यांना ‘लोहपुरुष’ म्हणून ओळख मिळाली.या भव्य रॅलीमध्ये युवक, शिक्षक, पत्रकार, डॉक्टर, पोलीस अधिकारी, पोलीस पाटील संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
डॉ. किरण बुधवंत, डॉ. मेश्राम, डॉ. नरवाडे, सुनील चऱ्हाटे, पीएसआय ताजणे, पीएसआय मुंडे, पीएसआय संजय घुले, सुनील इंगळे इत्यादींसह अनेक मान्यवर व विद्यार्थी सहभागी झाले.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने आयोजित ही वॉक फॉर युनिटी रॅली समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारी ठरली.या रॅलीद्वारे सरदार पटेल यांच्या विचारांना उजाळा देत देशभक्तीची भावना पुन्हा जागवण्यात आली.
अशा वाशिम जिल्ह्यातील बातम्यांसाठी आपल्या kattanews.in या पेज ला आत्ताच भेट द्या.










