साखरखेर्डा (वार्ताहर) |२२ मार्च २०२६
साखरखेर्डा येथे आयोजित इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचे दर्शन घडवत समाजात बंधुत्वाचा सुंदर संदेश दिला. माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असून, गावात एकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी रोजा उपवास करत अल्लाहची प्रार्थना केली. या पार्श्वभूमीवर जामा (दगडी) मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात हिंदू बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, “सण-उत्सव हे समाजाला जोडणारे माध्यम आहे. प्रत्येकाने आपले सण एकत्र साजरे करत बंधुभाव वाढवला पाहिजे.” साखरखेर्डा गावाशी असलेले जुने संबंध जपण्याचेही त्यांनी आवाहन केले.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाची पाहणी देखील त्यांनी केली.
या इफ्तार पार्टीचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले होते. यावेळी राजू ठोके, कमलाकर गवई, संग्रामसिंह राजपूत, दाऊद कुरेशी, रामदाससिंग राजपूत, आयुबसेठ कुरेशी, सय्यद रफीक, देवानंद खंडागळे, संतोष मंडळकर, शिवाजी जाधव, शुभम राजपूत, गजानन करेवाड, अमित जाधव, दिलीप खंडारे, शेख चांद कुरेशी, ललित अग्रवाल, प्रविण पाझडे, गणपत अवचार, कयुम मेंबर, हाजी नसिर भाई, शेख बाबू सुलेमान, शेख जावेद नाईकवाडी, इब्राहिम शहा, शेख युनुस, सिकंदर नाईकवाडी, फैजल पठाण, सैय्यद जुनेद, शहानवाज खान यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
👉 Related News
- साखरखेर्ड्यात आठवडी बाजारात आग्या मोहळाचा धुमाकूळ
- बुलढाणा जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
- चेक बाउन्स प्रकरणात कडक निकाल! आरोपीला 3 महिन्यांचा सश्रम कारावास; 2.80 लाखांचा दंड
👉 अधिक अपडेट्ससाठी Kattanews.in ला भेट द्या आणि आमच्यासोबत रहा!
i










