हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा येथून बेपत्ता मुलीचा शोध लागला; काकू, युवकासह दोन आरोपी अटकेत – मानवी तस्करीचा धक्कादायक खुलासा!

On: February 10, 2026 10:56 AM
Follow Us:
साखरखेर्डा बेपत्ता अल्पवयीन मुलगी प्रकरणात दोन आरोपी अटक
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा |१० फेब्रुवारी २०२६

साखरखेर्डा येथून २९ डिसेंबर रोजी सायंकाळी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर साखरखेर्डा पोलिसांनी शोध लावला आहे. या प्रकरणात मुलीला पळवून नेणारी नात्याने काकू असलेली महिला व एका युवकास पोलिसांनी अटक केली असून, मानवी तस्करी व बेकायदेशीर विवाहाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेमुळे साखरखेर्डा परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथील अल्पवयीन मुलगी २९ डिसेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत मुलीची आजी केसरबाई पारधे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, नात्याने काकू असलेली मिराबाई पारधे हिने चिखली येथे काळी-पिवळीने मुलीला बोलावून घेतले. तेथून तिला जळगाव खान्देश येथे नेण्यात आले आणि शुभम विनोद पाटील या युवकासोबत बेकायदेशीररित्या विवाह लावून देण्यात आला.

पोलिस चौकशीत मिराबाई पारधे हिने या विवाहाच्या बदल्यात आर्थिक व्यवहार केल्याचेही समोर आले आहे. पुढील तपासात सदर महिलेचे गुजरात राज्यातील अनेक व्यक्तींशी संपर्क असल्याचे आढळून आले असून, यापूर्वीही अशाच प्रकारे काही अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून विवाह लावून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

विशेष बाब म्हणजे, मिराबाई पारधे हिने स्वतः चार ते पाच वेळा विवाह करून अनेक युवकांची फसवणूक केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.

७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी शुभम विनोद पाटील यास ताब्यात घेतले असता, मिराबाई पारधे हिनेच आपले लग्न लावून दिल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी मिराबाई पारधे हिला ताब्यात घेतले असता, तिने तब्येत खराब असल्याचा बहाणा करत रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दक्षता घेत चिखली येथील खेडेकर रुग्णालयातून तिला ताब्यात घेतले.

आज ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, मिराबाई पारधे हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, शुभम विनोद पाटील याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सदर प्रकरणाचा तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

दरम्यान, काल संध्याकाळी आणखी एका युवतीने घरातून पळून जाऊन परस्पर एका युवकासोबत विवाह केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. संबंधित मुलगा-मुलीच्या विवाहाचे फोटो पोलिसांना प्राप्त झाले असून, पोलिस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.


👉 Related News


📌 अधिक स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment